शेवंताला आवडते ही गोष्ट, म्हणते

By  
on  

'रात्रीस खेळ चाले' च्या तिसऱ्या भागातून आता शेवंता पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. तेव्हा या मालिकेच्या तिसऱ्या भागात उत्सुकता ताणली गेली आहे. एकीकडे अण्णांचं भूत आणि माईही वृद्ध झाल्या आहेत. तर दुसरीकडे शेवंताची उत्सुकता आहे. यातच सोशल मिडीयावर शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर विविध पोस्ट शेयर करताना दिसत आहे.

सध्या उन्हाळा म्हणजेच आंब्याचा सिझन आहे. सोशल मिडीयावर अनेकांना आंब्याच्या पेटीसोबतचे फोटो शेयर केले आहेत. शेवंता म्हणजेच अपूर्वालाही आंबे प्रचंड आवडतात. मग काय अपूर्वानेही आंब्याने भरलेल्या पेटीसोबतचा फोटो सोशल मिडीयावर चाहत्यांसाठी शेयर केला आहे. 

 

एवढच नाही तर अपूर्वाला आंबे किती आवडतात हे तिच्या या पोस्टमधून लक्षात येतय. आता आंबा हे फळ सगळ्यांचच आवडतं फळ आहे. पण अपूर्वाने आंब्याची तारीफ हटके अंदाजात केली आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना, मेरा इश्क सूफियाना." अशा या सूफियाना अंदाजात अपूर्वा आंब्याची विषयीचं प्रेम व्यक्त करतेय. 

सोशल मिडीयावर अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग आहे. शेवंता या भूमिकेमुळे अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. शेवंतानंतर अपूर्वा ही 'तुझं माझं जमतय' या मालिकेत पम्मीच्या भूमिकेत झळकली होती. मात्र त्या मालिकेतून अपूर्वाने काढता पाय घेतला आहे. आणि पुन्हा एकदा ती शेवंता बनून समोर येत आहे. 

Recommended

Loading...
Share