या निसर्गरम्य ठिकाणी अमृता करतेय हिमांशूच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या एका खास ट्रीपवर असल्याचं समोर आलं आहे. निमित्त आहे अमृताचा पति हिमांशूच्या वाढदिवसाचं. हिमांशूच्या वाढदिवासानिमित्ताने दोघं एका खास ट्रीपवर आहेत. या वाढदिवसांच सेलिब्रेशन दोघं जम्मू-कश्मीरमध्ये करत आहेत.

अमृताने सोशल मिडीयावर हिंमाशूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फोटो शेयर केला आहे. यासोबतच या ट्रीपचे खास फोटो अमृता आणि हिमांशूने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहेत. तेव्हा अशा निसर्गरम्य ठिकाणी दोघं सुट्टीची मजा लुटत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत आहेत. 

2015 मध्ये अमृता आणि हिमांशूने लगीनगाठ बांधली होती. एका रिएलिटी शोच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 'नच बलिये' या डान्स रिएलिटी शोमध्ये दोघांनी कपल म्हणून सहभाग घेतला होता. दोघांनी या कार्यक्रमात एकापेक्षा एक डान्स सादर करून त्या पर्वाची विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली होती. 

Recommended

Loading...
Share