By  
on  

‘बाळा’सिनेमात ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकरांची विशेष भूमिका

यशस्वी कर्णधारदर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची ख्याती होती. निवृत्तीनंतरही त्यांचे क्रिकेटशी नाते तुटले नाही. चित्रपटाच्या माध्यमातूनही आपले क्रिकेटप्रेम जपत त्यांनी एक विशेष भूमिका ‘बाळा’ या मराठी चित्रपटात साकारली. येत्या ३ मे ला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

क्रिकेटवर आधारलेल्या ‘बाळा’ चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत ते आपल्याला दिसणार आहेत. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेची अचूक पारख त्यांना होती. कोणामध्ये किती क्षमता आहे ? हे त्यांना बरोबर माहित असे. ‘बाळा’ चित्रपटातल्या बाळा या मुलाच्या क्रिकेट ध्यासाची ते कशी दखल घेतात आणि त्याच्या गुणांची पारख करत त्याला कशाप्रकारे घडवतात याची प्रेरणादायी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

या भूमिकेबद्दल विचारणा केल्यानंतर मला अभिनय जमणार नाही!’, असं सांगणाऱ्या अजित वाडेकर यांना अभिनेता विक्रम गोखले यांनी तुला अभिनय नाही तर तुझ्या आवडीची प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळायची आहे’, असं सांगितल्यानंतर विक्रमजींच्या विनतीला मान देत अजित वाडेकर यांनी या चित्रपटाला होकार दिला.

यश अँड राज एंटरटेंन्मेट’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मितीनिर्माते राकेश सिंग यांनी केली असून सचिंद्र शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात उपेंद्र लिमयेक्रांती रेडकर,विक्रम गोखलेसुहासिनी मुळ्येकमलेश सावंत या मातब्बर कलाकारांसोबत मिहीरीश जोशी हा नवा चेहरा तसेच यशवर्धनराजवर्धनआशिष गोखलेज्योती तायडे अपेक्षा देशमुख, हिया सिंग हे सहकलाकार दिसणार आहेत.

सोनू निगमआदर्श शिंदेरोहित राऊतनिहार शेंबेकरउर्मिला धनगर या गायकांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. विजय गमरे यांनी लिहिलेल्या गीतांना महेश-राकेश यांनी संगीत दिले आहे. छायांकन आर.आर प्रिन्स तर संकलन अभिजीत कुंदार यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन विष्णू देवाहबीबा रेहमानफुलवा खामकर यांनी केले आहे. वेशभूषा चैत्राली डोंगरे यांची आहे.

३ मे ला बाळा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive