By  
on  

बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे झाला मामा, शिवच्या बहिणीला कन्यारत्न

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेला नुकतीच गोड बातमी मिळाली आहे. ही बातमी त्याच्या बहिणीकडून मिळाली आहे. शिवा ठाकरे आता मामा झाला आहे. शिवची बहीण मनिषाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शिवने ही गोड बातमी सोशल मिडीयावर शेयर केली आहे. शिवचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे.

मामा बनल्याची बातमी शिवने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केली आहे. त्यामुळे शिववर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवची गर्लफ्रेंड अभिनेत्री वीणा जगतापनेही शिव, त्याची बहीण मनिषा आणि त्याच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये शिव लिहीतो की, "अखेर आज सुंदर परीचं आगमन झालं आहे. स्वागत आहे भाची.. मामा खूप प्रेम आणि सरप्राईज सोबत तयार आहे." तेव्हा या गोंडस मुलीच्या आगमनाने शिवला किती आनंद झालाय हे पाहायला मिळतय. या गोंडस परीचे लाड शिव मामा पुरवणार यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive