By  
on  

"ते येतायत" म्हणत अमेय वाघने शेयर केला रक्ताने माखलेल्या शर्टमधील फोटो

'झोंबीवली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा झोंबींवर आधारित आहेत. अनेक इंग्रजी सिनेमांमध्ये पाहिलेले झोंबी या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसतील. 

अभिनेता अमेय वाघ या सिनेमाच्या विविध अपडेट्स सोशल मिडीयावर पोस्ट करतोय. नुकताच अमेयने सिनेमाच्या सेटवरील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अमेयचा शर्ट रक्ताने माखलेला दिसतोय. हा पोटो पाहुन सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये वैदेही झोंबींपासून पळताना दिसतेय. तर ललित या झोंबींशी दोन हात करताना दिसतोय. अमेय पोलिसांना झोंबींविषयी सांगताना दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

शिवाय अमेयने पोस्टमध्ये म्हटलय की, "झुंबी नाही साहेब........ झों झों झोंबी !!!! ते येतायत !!! तुम्ही तयार आहात का?" तेव्हा झोंबी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं त्याने सांगीतलय. येत्या 30 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील झोंबीचा थरार पाहणं रंजक ठरेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive