By  
on  

सोनाली कुलकर्णीला येतेय फियान्से कुणालची आठवण, शेयर केले हे फोटो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मिडीयावर काही खास फोटो नुकतेच शेयर केले आहेत. हे फोटो आहेत तिचा फियान्से कुणाल बेनोडेकर सोबतचे. सोनाली सध्या कुणालपासून दूर असल्यानं त्याला मिस करत आहे. या आठवणीत सोनालीने हे रोमँटिक फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल ्अगदी गोड दिसतय. 

सोनाली या पोस्टमध्ये लिहीते की, "हेय, कुणाल तुझी आठवण येतेय. आमच्याकडून 3 फुल्स तुम्हा सगळ्यांसाठी. फुल्स महिना तुला चांगला जावो."

सोनालीने मागील वर्षी कुणालसोबत साखरपुडा केला. सोनालीने तिच्या वाढदिवशी कुणालसोबतच्या नात्याचा खुलासा करत दुबईत साखरपुडा केल्याचं सांगीतलं होतं. सोशल मिडीयावर साखरपुड्याचे फोटोही शेयर केले होते. त्यानंतर या कपलचे अनेक फोटो चर्चेत आले. आता हे गोड जोडी विवाहबंधनात कधी अडकतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive