By  
on  

पाहा Video : अभिनेता सिद्धार्थ जाधवने असा मारला होता षटकार, शेयर केला अविस्मरणीय क्षण

2 एप्रिल 2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. नुकतेच त्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पाहायला मिळाल्या. यात अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या निमित्ताने सिद्धार्थने जबरदस्त आठवण शेयर केली आहे.

सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव वीर मराठी संघातून खेळला होता. त्यावेळी सिद्धार्थने जबरदस्त षटकार मारला होता. ती आठवण सिद्धार्थने सोशल मिडीयावर शेयर केली आहे. एवढच नाही तर त्यासोबतच वर्ल्ड कपच्या फायनलला धोनीने मारलेल्या षटकाराचीही आठवण करुन दिली. हा व्हिडीओ शेयर करत सिद्धार्थने वर्ल्ड कप विक्टरीला 10 वर्षे पूर्ण झाल्याची आठवण शेयर करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

 

सिध्दार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "वीर मराठी' या संघातून CCL खेळत असताना चा हा अविस्मरणीय क्षण..माझ्या "वीर मराठी" साठी मारलेला हा षटकार आणि धोनी ने मारलेला world cup च्या फायनल चा षटकार.. दोन्ही क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय.. आपल्या "World Cup victory" ला १० वर्ष पूर्ण होत आहेत त्या बद्दल भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.."

सिद्धार्थ जाधवला अभिनयासोबतच खेळाचीही प्रचंड आवड आहे. विशेषकरून क्रिकेट या खेळाचा तो मोठा चाहता असून हा खेळ खेळायला त्याला प्रचंड आवडतं आणि ते तो उत्तम खेळत असल्याचं उदाहरण या व्हिडीओतून पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive