By  
on  

पाहा Video : भाऊ कदम असं करतो स्कीटचं पाठांतर, व्हिडीओ पाहुन हसू आवरणार नाही

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात मंचावर या कार्यक्रमातील कलाकारांची जशी जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळते, तशीच ऑफस्क्रिनही हे कलाकार धमाल करतात. कामासोबतच ऑफस्क्रिन हे कलाकार धमाल करतात. आणि अशी धमाल पोस्ट करायला सोशल मिडीया आहेच. त्यात कुशल बद्रिके या सगळ्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसतो. कुशल हा सोशल मिडीयावर या विनोदवीरांची ऑफस्क्रिन मस्ती शेयर करतो. नुकताच कुशलने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ आहे भाऊ कदमचा. आता भाऊ कदमच्या पाठांतरावरुन त्याची खिल्ली उडवली जाते हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र हाच भाऊ ऑफस्क्रिन स्कीटच्या तयारीसाठी पाठांतर कसा करतो हे या व्हिडीओत पाहायला मिळतय. हा मजेशीर व्हिडीओ कुशल बद्रिकेने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

 

या व्हिडीओत भाऊ स्क्रिप्ट वाचताना झोपलेला पाहायाला मिळतोय, भाऊला झोपलेलं पाहुन कुशल त्यांना भाऊ "काय करतोय़ ?"  हे विचारतो तर "पाठांतर करतोय" असं भाऊ उत्तर देतो. कुशल या पोस्टमध्ये लिहीतो की, "भाऊ कदम यांच पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा"

मात्र सत्य परिस्थितीत हे कलाकार प्रचंड मेहनत घेतात. ते मंचावरील त्यांच्या परफॉर्मन्स मधून पाहायला मिळतय. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांना भरपुर हसवतो आणि त्यांचं मनोरंजन करतो.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive