By  
on  

अभिनेते प्रशांत दामले यांनी कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस

अभिनेते प्रशांत दामले यांचा नुकताच वाढदिवस झाला. नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमातून प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी प्रशांत यांनी कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला. 

नुकतच प्रशांत दामले यांनी सोशल मिडीयावर त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांचं कुटुंब प्रशांत यांचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. 

ते पोस्टमध्ये लिहीतात की, "ऐन तारुण्यात वाढदिवसाची वाट बघण्याचीही वेगळीच मजा असते. पण पुढे वाढदिवस म्हणजे वयाचा मिटर आणखी एका वर्षानं पुढं सरकवणारा दिवस, असं काहीसं वाटतं. आजची सुरूवात काहीशी अशी झाली, पण तुमच्या शुभेच्छांच्या पावसात मी अक्षरश: न्हावून निघालो. ऐन उन्हाळ्यात मनाला नवी पालवी फुटली. पुन्हा तरुण होऊन मी आजच पुढच्या वाढदिवसाची वाट बघू लागलोय. आयुष्याचं सिंहावलोकन वगैरे करण्यावर माझा विश्वास नाही. पण या विदुषकावर तुम्ही इतका जीव लावला, हेच आयुष्याचं संचित! आणखी काय हवं? शुभेच्छा देणा-या प्रत्येकाला वैयक्तिक भेटायला आवडेल, पण सध्या शक्य नाही. पण भविष्यात नक्कीच भेटुयात. तोपर्यंत सुरक्षित रहा. आनंदात रहा. तुमच्या शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा खूप खूप आभार!"

तेव्हा मनोरंजन विश्वातील विविध माध्यमातून आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याला वाढदिवसानिमित्ताने अनेक शुभेच्छा मिळाल्या. शिवाय कुटुंबाने केलेलं त्यांच्या वाढदिवसाचं हे सेलिब्रेशन खास ठरलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive