नुकतच अभिनेता अमेया वाघच्या बहिणीचा लग्नसोहळा पार पडला. प्रत्येक भावासाठी बहिणीचं लग्न हे खास असतच. अमेयसाठीही होतं, म्हणूनच त्याने या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. बहिण स्मिताच्या लग्नातील काही फोटो अमेयने एका व्हिडीओच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत.
यासोबत या व्हिडीओत 'किती सांगायचंय मला' हे गाणं आहे. कॅप्शनमध्ये अमेय लिहीतो की, "बहिणीच्या लग्नातल्या आठवणी आणि किस्से .... किती सांगायचंय मला". या व्हिडीओत अमेयचे त्याच्या बहिणीसोबतचे फोटो आहेत. शिवाय पत्नी साजिरीसोबत अमेयने या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हा अमेय आणि साजिरीचेही गोड फोटो दिसत आहेत. बहिणीच्या लग्नात भावुक झालेला अमेयही दिसतोय.
यावेळी अमेयचा ट्रेडिशनल लुक पाहायला मिळाला. गोल्डन, क्रिम रंगाच्या कुर्ता, पायजमा, जॅकेट असा अमेयचा लुक होता. तर साजिरीने हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती.