By  
on  

पाहा Video : प्रिया बापट म्हणते, "सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भली बुरी", गायलं हे गाणं

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत दोघही नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांची कोविड चाचणी पॉजिटिव आल्याची माहिती त्यांनी सोशल मिडीयावर दिली होती. म्हणूनच दोघं घरातच क्वारंटाईन होते. नुकतच दोघांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून दोघं बरे झाले आहेत. 

यातच प्रिया बापटने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत प्रिया चक्क गाताना दिसतेय. 'एैरणीच्या देवा' हे गाणं ती गातेय. सध्या कोरोना काळात हे गाणं तिला सुचल्यानं तिने हा व्हिडीओ केलाय. सोबतच कॅप्शनमध्ये "गो कोरोना गो" असं प्रियाने लिहीलय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

'एैरणीच्या देवा' या गाण्यातील "सुख थोडं दु:ख भारी दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊं दे" हे कडवं प्रियाने म्हटली आहे. जी सध्याचा कोरोनाग्रस्त परिस्थितीला साजेशी वाटतेय. या व्हिडीओत हे गाणं प्रियाने उत्तम सादर केलय. त्यामुळे तिच्या चाहत्यांनीही या व्हिडीओ पसंती दिली आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive