By  
on  

पाहा Video : या जुन्या गाण्यावर मराठी बिग बॉस फेम अभिनेत्रीचे सुंदर एक्सप्रेशन्स

बिग बॉस या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यातच मराठी भाषेतही हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आला. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे स्पर्धक आजही चर्चेत असतात. त्यापैकीच एक अभिनेत्री सई लोकूर. सोशल मिडीयावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी सई विविध पोस्ट करत असते.

सईने नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. नव्या काळ्या रंगाच्या साडीचा पेहराव सईने केला होता. या साडी लुकवर चंदेरी दागदागिने शोभून दिसत होते. या सुंदर पेहरावात मग सईने खास व्हिडीओही केला. सध्या सोशल मिडीयावर जुन्या गाण्यांवर व्हिडीओ करण्याचा ट्रेंड आहे. त्यातच सईने "जहा मै जाती हूँ वही चले आते हो" या प्रसिद्ध गाण्यावर हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत सईचे जबरदस्त एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. एवढच नाही तर सईच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडलाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

 

या काळ्या रंगाच्या साडी लुकमध्ये सईने काही फोटोही क्लिक केले आहेत. हे फोटो देखील सई लोकूरने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केले आहेत. सईने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सई स्पर्धक म्हणून दिसली होती. त्या पर्वात सईने विविध टास्क उत्तमरित्या केले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive