अभिनेत्री अमृता सुभाष सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. बॉम्बे बेगम्स या वेब सिरीजमधील तिच्या भूमिकेचं सध्या कौतुक होतय. या सिरीजच्या निमित्ताने अमृताने तिची जुनी मैत्रीण शहाना गोस्वामीसोबत काम केलय. नुकतच सोशल मिडीयावर अमृताने शहानासोबतच्या मैत्रीवषियी खास पोस्ट केली आहे.
अमृताने बॉम्बे बेगम्सच्या प्रमोशनदरम्यानचे शहानासोबतचे सुंदर फोटो शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये अमृता सांगते की, "ही माझी जुनी मैत्रिण शहाना गोस्वामी. आम्ही दोघींनी काही वर्षांपूर्वी फिराक या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. घट्ट मैत्रिणिंचं. आणि आम्ही खरंच मैत्रिणी झालो. दोघींचा आवडता लेखक मुराकामी, दोघींची आवडती टूथपेस्ट मेसवाक, दोघी टाॅरस.. यादी वाढतच गेली. मग शहाना फ्रान्सला गेली . मी कान फेस्टीवलसाठी तिथे गेले तर शहाना आणि मी अचानक रस्त्यात भेटलो आणि रोज भेटत असल्यासारख्या बडबडायला लागलो.त्यानंतर आत्ता भेटलो बाॅंबे बेगम्स साठी . हा पब्लिसिटीचा दिवस होता . दोघी आपापल्या मेकप व्हॅन्स मधनं बाहेर पडलो आणि अचानक हे फोटो शूट सुरू झालं. पुढचे फोटोज् पाहिले की कळतं आम्ही दोघीही मधेच कॅमेरा आणि फोटोज् विसरून गप्पाच मारु लागलो आहोत नेहमीसारख्या! शेवटचा फोटो विशेष आहे!त्यात मी शहानाकडे अभिमानाने पाहते आहे! शहाना, तू बाॅंबे बेगम्समधली फातिमा वारसी अप्रतीम रंगवलीस! तुझं खूप खूप कौतुक सखे."
'फिराक' या चित्रपटात अमृता आणि शहाना एकत्र झळकल्या होत्या. यासोबतच दोघींच्या अनेक आवडीनिवडी सारख्या असल्याचं ती या पोस्टमध्ये सांगते. शहाना तिची घट्ट मैत्रिण असल्याचं अमृता या पोस्टमध्ये म्हणतेय. दोघींच्या या फोटोंमधून त्यांची मैत्री पाहायला मिळतेय.