कोरोनातून बरी झाल्यानंतर या अभिनेत्रीची पुन्हा वर्कआउटला सुरुवात

By  
on  

अभिनेत्री प्रिया बापटला कोरोनाची लागण झाली होती. प्रिया आणि पति उमेश कामतची कोविड चाचणी पॉजिटिव आली होती. त्यानंतर दोघही घरातच क्वारंटाईन होते. नुकताच दोघांचा क्वारंटाईन काळ संपला असून दोघं कोरोनातून बरे झाले आहेत. प्रिया आता पुन्हा फिटनेसकडे लक्ष देत आहे.

प्रियाने पुन्हा हळूहळू वर्कआउटला सुरुवात केली असल्याचं ती सोशल मिडीयावर सांगते. प्रिया सांगते की, "अखेर पुन्हा हळूहळू वर्कआउटकडे वळले. बरी झाल्यापासून मी फक्त घरात चालत होते. 20 मिनीटे साधं चालण्यापासून मी सुरुवात केली होती. मला आनंद आहे की मी आज 3 किलोमीटर चालणे आणि धावणे करु शकले आणि तेही घरातच. धावण्यासाठी अद्याप घराबाहेर पडलेले नाही. माझी क्षमता पुन्हा मिळवत आहे. आणि घरात चालू, धावुन आणि सुर्यनमस्कार करून पुन्हा ताकद मिळवत आहे. बरे झाल्यानंतरची ट्रेनिंग ही गरजेची आहे. तुम्हाला तुमच्या शरीराचं ऐकणं गरजेचं आहे. तुमचे डॉक्टर आणि फिटनेस ट्रेनर जे सांगतात ते करा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

 तेव्हा कोविड 19 मधून बरी झाल्यानंतर प्रिया तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देताना दिसत आहे. लॉकडाउनच्या काळातही प्रिया आणि उमेश घरातच व्यावाय करत असे. प्रियाने आता घरातच वर्कआउटला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या संकटावर मात केल्यानंतर आता प्रिया पुन्हा जोमाने कामाला लागेल यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share