"लांबचा प्रवास करताना कुठे तरी क्षणभर थांबाव लागत" म्हणत भरत जाधव यांनी करुन दिली या चित्रपटाची आठवण

By  
on  

अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मिडीयावर नुकतीच एक खास आठवण शेयर केली आहे. 'क्षणभर विश्रांती' या मराठी चित्रपटाला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भरत यांनी ही खास आठवण पोस्ट केली आहे.

भरत यांनी या चित्रपटातील कलाकारांसोबतचा सेटवरील फोटो शेयर केला आहे. भरत या पोस्टमध्ये लिहीतात की, "लांबचा प्रवास करताना कुठे तरी क्षणभर थांबाव लागत, कारण क्षणभर घेतलेली विश्रांती पुढचा प्रवास सोयीस्कर आणि सोपा करते. नव्या उमेदीने आपण पुढची वाटचाल करायला सिद्ध होतो. ११ वर्ष....क्षणभरविश्रांती..!!"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

9 एप्रिल 2010 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकले होते. अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, मनवा नाईक, हेमंत ढोमे, कादंबरी कदम, मौलीक भट्ट, पूजा सावंत, शुभांगी गोखले, जयराज नायर हे कलाकार झळकले होते. 

भरत यांनी शेयर केलेल्या फोटोंनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. 

Recommended

Loading...
Share