उमेश - प्रियाची पाडव्याची तयारी ? शेयर केला रोमँटिक फोटो

By  
on  

अभिनेता उमेश कामतने सोशल मिडीयावर नुकताच एक खास फोटो शेयर केला आहे. या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलय. या फोटोत उमेश - प्रिया एकत्र दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली होती. दोघांची कोविड चाचणी पॉजिटिव आली होती. आता दोघांनी कोरोनावर मात केली आहे. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून दोघही कोरोनातून बरे झाले आहेत.

गुढीपाडव्याचा सण येत असल्याने उमेशची ही खास पोस्ट पाहायला मिळतेय. मुख्य म्हणजे या फोटोत दोघही फेस्टिव्ह लुकमध्ये दिसत आहेत. उमेश या पोस्टमध्ये लिहीतो की, "काय म्हणते आहे ही? पाडवासाठी तयार व्हा, की.."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

उमेशच्या या पोस्टने सध्या कोड्यात पाडलं आहे. तेव्हा पाडव्याच्या निमित्ताने दोघं काही खास घोषणा करणार आहेत की काय असही दिसतय. तेव्हा या खास फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलय. या फोटोत उमेशने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर प्रियाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या फेस्टिव्ह लुकमध्ये दोघं सुंदर दिसत आहेत.

Recommended

Loading...
Share