नव्या म्युझिक व्हिडीओत झळकणार मोनालिसा बागल आणि अभिजित अमकर

By  
on  

अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता अभिजित अमकर ही जोडी लवकरच "मन उनाड उनाड..." या म्युझिक व्हिडिओत दिसणार आहे. 'झाला बोभाटा', 'भिरकीट','बेभान' अशा अनेक चित्रपटांमधून मोनालिसा बागल चर्चेत आली तर 'एक सांगायचंय', 'टकाटक' अशा चित्रपटांतून अभिजित अमकरनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. या नव्या गाण्याच्या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदाच एकत्र दिसतील. त्यांचा हटके रोमान्स या गाण्यात पाहायला मिळणार आहे. या यंगस्टर कपलची केमिस्ट्री नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टर्समध्ये पाहायला मिळतेय.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. बीना राजाध्यक्ष सहनिर्मात्या आहेत. सप्तसूर म्युझिक आणि फिल्मी आऊल स्टुडिओज या म्युझिक व्हिडिओचे प्रस्तुतकर्ते आहेत. किरण कलकुंबे आणि विशाल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं मधुर शिंदे आदिती नेरूरकर यांनी गायलं आहे. तर सविता करंजकर जामले यांनी गीतलेखन केलं आहे. कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे, तर अनिकेत यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होईल. 


 

Recommended

Loading...
Share