By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील मायाला चाहत्याकडून चक्क मिळालं हे गिफ्ट, रुचिराची ही इच्छा झाली पूर्ण

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका इतकी गाजली की या मालिकेतील प्रत्येक पात्र चर्चेत राहिलं. मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालच शिवाय काही कलाकारांना या मालिकेतून एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेत्री रुचिरा जाधव या मालिकेत मायाच्या भूमिकेत दिसली. अनेकांची काहीना काही स्वप्ने आणि इच्छा असतात. रुचिराचीही एक इच्छा होती जी नुकतीच पूर्ण झाली आहे.

'बाहुबली' हा सिनेमा पाहून रुचिराच्या मनात एक इच्छा निर्माण झाली होती. या सिनेमातील अभिनेत्री देवसेनाचं जसं पोट्रेट असतं तसच पोट्रेट म्हणजे मोठं स्वत:चं चित्र रुचिराला हवं होतं. हे इच्छा तिने आईलाही सांगीतली होती. तिची हीच इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. 

कलाकारांना त्यांच्या चाहत्यांकडून अनेक गिफ्ट्स आणि शुभेच्छा मिळत असतात. असच एक गिफ्ट रुचिराच्या चाहत्याने तिला पाठवलं. ज्यात रुचिराचं पोट्रेट म्हणजेच मोठं चित्र काढण्यात आलय. यासाठी रुचिराने चाहत्याने आभार मानले आहेत. रुचिरा लिहीते की, "मला नेहमी पाहिजे होतं की, आई मला ते हवय माझं पोट्रेट. जसं बाहुबलीमध्ये बल्लाळदेव देवसेनाचं चित्र दाखवतं तसं. आणि माझी ही इच्छा काही प्रमाणात सत्यात उतरली आहे. हे खूप मोठं आणि जड सरप्राईज मिला मिळालय."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

 

या पोट्रेट म्हणजेच मोठ्या फोटो फ्रेमसोबतचे फोटो रुचिराने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. शिवाय आणखी एका चाहत्याने रुचिराला तिचं स्केच बनवूनही पाठवलय. चाहत्यांचं मिळणारं हे प्रेम पाहुन रुचिराला प्रचंड आनंद झाला असून तिने तो आनंद सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive