By  
on  

लहानपणी असा दिसायचा हा अभिनेता, भूतकाळात डोकावून शेयर केली ही आठवण

सोशल मिडीयावर अनेक कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. यात कधी लहापणीचे, जुने फोटो शेयर करुन त्या आठवणी ताज्य केल्या जातात. अभिनेता उमेश कामतनेही त्याची खास आठवण शेयर केली आहे. नुकतच उमेशने सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोतून त्याने त्याच्या लहानपणीची आठवण शेयर केली आहे.

या फोटोत लहानपणीचा उमेश कामत पाहायला मिळतोय. त्याच्या मित्रांसोबतचा हा फोटो आहे. या फोटोच्या निमित्ताने त्याने खास आठवण शेयर केली आहे. ही आठवण आहे त्याच्या पहिल्या ट्रेकची. हा फोटो शेयर करत "यातला मी कोण?" असंही त्याने नेटकऱ्यांना विचारलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

उमेश या पोस्टमध्ये लिहीतो की, "ओळखा पाहू, यातला मी कोण ?  वर्तमान काळ जसा चालला आहे त्यामुळे थोडं भूतकाळात डोकवावसं वाटलं. आयुष्यातील पहिला ट्रेक."

या फोटोतून उमेशने त्याच्या आयुष्यातील पहिल्या ट्रेकची आठवण शेयर केली आहे. भूतकाळात डोकावून उमेशने ही खास आठवण चाहत्यांसोबत शेयर केली. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive