By  
on  

पाहा Video : स्मिता गोंदकरने केला या गाण्यावर डान्स, वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मिडीयावर डान्स व्हिडीओचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर सक्रिय असतात. त्यांचे विविध व्हिडीओ, फोटो ते त्यांच्या चाहत्यांसाठी पोस्ट करतात. यातच कलाकारांचे डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत असतात. अभिनेत्री स्मिता गोंदकरही तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही इंटरेस्टिंग गोष्टी पोस्ट करताना दिसते.

स्मिताने नुकताच एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत स्मिता ऐका दाजीबा या गाण्यावर थिरकतेय. गायिका वैशाली सामंतने गायलेलं हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलं होतं. आजही या गाण्याची जादू कायम असल्याचं पाहायला मिळतय. या गाण्यावर स्मिताच्या सुंदर अदा आणि लुक पाहायला मिळतोय. 

 

'कॉमेडी बिमेडी' या विनोदी कार्यक्रमाचं स्मिता सुत्रसंचालन करतेय. तिची सुत्रसंचालनाची हटके स्टाईल आणि लुक सगळ्यांचं लक्ष वेधतय. याशिवाय 'काय घडलं त्या रात्री' या मालिकेतही ती झळकतेय. 'पप्पी दे पारुला' या गाण्यामुळे स्मिता मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. याआधी स्मिताने विविध हिंदी स्टंट शोमध्ये भाग घेतला होता. बाईक राईड आणि त्यावरील विविध स्टंट करण्यासाठी स्मिता ओळखली जाते. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातही स्मिता स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बिग बॉस मराठीच्या माध्यमातून स्मिताने चाहत्यांची मनं जिंकली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive