By  
on  

"बस एक सनम चाहिये, ऐकत कधीही न पटू शकणाऱ्या मुलींच्या प्रेमात पडलो" म्हणत चिन्मयने श्रवण राठोड यांना वाहिली श्रद्धांजली

नदीम - श्रवण या प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी श्रवण राठोड यांचं नुकतच निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रवण यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. नदीम - श्रवण या जोडीच्या गाण्यांना कायमच प्रेक्षकांना आवडली. त्यांची गाणी अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनली होती. त्यांच्या जाण्यानं अनेकांनी सोशल मिडीयावर दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकरही नदीम - श्रवण यांच्या गाण्यांचा चाहता आहे. श्रवण यांच्या जाण्यानं त्यालाही प्रचंड दु:ख झालय. चिन्मयने खास पोस्ट करत श्रवण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चिन्मय या पोस्टमध्ये लिहीतो की, "आमच्या नवतारुण्याचं पार्श्व संगीत हरवलं. कधी ही न पटू शकणार्‍या मुलींच्या प्रेमात पडलो 'बस एक सनम चाहिये आशिकी के लिए' ऐकत. 'तेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं' म्हणत प्लॅटफॉर्म नं २ वर वाट पाहिली. आणि ब्रेक अप झाल्यावर 'जिये तो जिये कैसे' म्हणणार्‍या संजू बाबा सारखं दु:खी पण ग्लॅमरस दिसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. प्रत्येक वळणावर नदीम श्रवण होते. साक्षात श्रवणजींना एकदा हे सांगण्याची संधी ही देवानं मला दिली. परवाच कुणाला तरी म्हटलं होतं 'सध्या सिनेमा संगीताचा जो चिखल झालाय त्यातून बाहेर काढायला आता एक नदीम श्रवण यायलाच हवेत.' अजून ही वाट पाहतोय. श्रवणजी शांततेत प्रवास करा आणि खूप खूप धन्यवाद." 

 

या पोस्टमध्ये चिन्मयने त्यांच्या गाण्यांचा त्याच्या खऱ्या आयुष्यात कसा परिणाम होत होता याविषयी लिहीलय. शिवाय सध्याच्या सिनेमांच्या संगीताविषयी म्हणताना तो सध्याचं सिनेमा संगीताचं चिखल झाल्याचं सांगतो आणि पुन्हा असेच नदीम - श्रवण कधी येतील याची वाट पाहत असल्याचं म्हणतोय. 

नदीम - श्रवण या जोडीने 90 च्या दशकात अनेक सुपरहीट गाणी दिली. अनेक हिट सिनेमांसाठी त्यांनी गाणी केली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive