By  
on  

'साजणी तू' गाण्यात दिसणार ग्लॅमरस स्मिता गोंदकरची अदा

 'पप्पी दे पारुला' या गाण्यातून अभिनेत्री स्मिता गोंदकरने लक्ष वेधलं होतं. त्यानंतर सिनेमा, मालिका आणि रिएलिटी शो मधून स्मिता झळकतेय. मात्र यासोबत विविध म्युझिक व्हिडीओतही ती दिसणार आहे. 'साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती तारा' असे बोल असलेल्या साजणी तू या म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर झळकणार आहे. आदित्य बर्वेनं या म्युझिक व्हिडिओचं संगीत आणि दिग्दर्शन केलं आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे.

सप्तसूर म्युझिक प्रस्तुत "साजणी तू...." या म्युझिक व्हिडिओची निर्मिती व्हीबी फिल्म्स आणि सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अंबरीश देशपांडेनं लिहिलेलं हे गाणं ऋषिकेश रानडेनं गायलं आहे. अशोक पवार या म्युझिक व्हिडिओचे छायालेखक आहेत. रोहन गोगटे, अजित नेगी यांनी संकलन केलं आहे. 

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्मिता स्पर्धक म्हणून झळकली होती. त्यानंतर तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. 'कॉमेडी बिमेडी' या विनोदी कार्यक्रमात ती सुत्रसंचालन करत आहे. तर 'काय घडलं त्या रात्री' या मालिकेतही भूमिका साकारली. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive