कोरोनाचं भयावह संकट यावर्षीही राज्यासह देशावर ओढावलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिरकाव करत अनेकांचा जीव घेतला आहे. यात दिल्लीतही कोरोनाने थैमान घातलं आहे. दिल्लीतील परिस्थिती तर ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. दिल्लीतील काही दृश्ये सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या दृश्यांमध्ये दिल्लीतील बागेचे रुपांतर स्मशानभूमीत झाल्याची दृश्ये आहेत. दिल्लीतील ही परिस्थिती पाहुन अनेक जण सोशल मिडीयावर व्यक्त होतायत.
अभिनेता हेमंत ढोमेने देखील याविषयी पोस्ट केली आहे. लहान मुलांचं खेळण्या बागडण्याची बाग जेव्हा स्मशानभूमीत रुपांतरीत होते यांचं दु:ख हेमंतने व्यक्त केलं आहे.
बाग म्हणजे...
खेळायची जागा...
आज्जी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची... चिऊताई... खारूताई बघायची जागा...
साळुंखीची जोडी शोधायची जागा...
तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं...
पण आपण सारे मिळुन या राक्षसाला हरवु!
पुन्हा बागडायला आपल्या फुलांच्या बागा मिळवु! pic.twitter.com/XalGaA4OL1— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 27, 2021
हेमंत या पोस्टमध्ये लिहीतो की, "बाग म्हणजे.. खेळायची जागा.. आज्जी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची... चिऊताई... खारूताई बघायची जागा...साळुंखीची जोडी शोधायची जागा...तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं...पण आपण सारे मिळुन या राक्षसाला हरवु. पुन्हा बागडायला आपल्या फुलांच्या बागा मिळवु"