ज्येष्ठ निर्माते आणि नाटककार शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी निधन झाले आहे. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शेखर यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 19 एप्रिल रोजी शेखर यांच्या पत्नीचे देखील कोरोनाने निधन झाले होते. ते 70 वर्षांचे होते.
शेखर ताम्हाणे यांच्या निधनाने नाट्यसृष्टी हळहळली आहे. अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'सविता दामोदर परांजपे', 'तिन्हीसांज' या नाटकांचे लेखन तर 'वेलकम जिंदगी', 'दिली सुपारी बायकोची' या नाटकांची त्यांनी निर्मिती केली होती.
शेखर यांची मुलगी आरतीने आईच्या निधनानंतर कोरोनासंदर्भातील जनजागृती करणारी पोस्ट सोशल मिडीयावर केली होती.