संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन दरवर्षी उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो. मात्र सध्या महाराष्ट्रावरच ओढावलेलं कोरोनाचं संकट फार गंभीर आहे. संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येऊन या संकटाला सामोरं जात आहे. यात महाराष्ट्रातील कोरोना वॉरियर्ससह महाराष्ट्राचे नागरीकही यात कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहेत. विविध क्षेत्रासह मनोरंजन विश्वातील कलाकारही महाराष्ट्रासाठी धावुन आलेत. सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात करून विविध पद्धतिने मदतीचा हात दिला जात आहे.
आजच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधुन अनेक कलाकारांंनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेनं घरात राहुन एकमेकांना मदतीचा हात देण्याचं आवाहन अनेक कलाकार करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही सोशल मिडीयावर महाराष्ट्रातील जनतेसाठी संदेश दिला आहे.
सोनाली लिहीते की, "राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले, आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया.. हुतात्मे ते झाले, आपण मराठी माणसाला वाचवूया.. आज पुन्हा गरज़ आहे एकत्र येण्याची, एकमेकांसाठी, या महाराष्ट्रासाठी, एकजुट होऊया.. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया. जय महाराष्ट्र."
राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले,
आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया..
हुतात्मे ते झाले,
आपण मराठी माणसाला वाचवूया..
आज पुन्हा गरज़ आहे एकत्र येण्याची,
एकमेकांसाठी,
या महाराष्ट्रासाठी,
एकजुट होऊया..
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया.#महाराष्ट्रदिन जय महाराष्ट्र #माझामहाराष्ट्र— सोनाली (@meSonalee) May 1, 2021
तेव्हा शूरविरांच्या या महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर सगळ्यांनी एकजुट होऊन महाराष्ट्राला वाचवण्याचं आवाहन सोनाली करतेय.