By  
on  

"देशावर ओढावलेलं संकट हे या विषाणूविरोधातील आंदोलनच" म्हणत अमृता खानविलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रवर ओढावलेलं कोरोनाचं संंकटही बिकट आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश या कोरोनाशी दोन हात करत आहे. या सगळ्यात अनेक जण महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून वाचवण्यासाठी मदतीचा हातही देत आहेत.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय. या संकटातही हतबल न होता महाराष्ट्रातील जनतेने एकजुट होण्याचं आवाहन अनेक कलाकार सोशल मिडीयावर करत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खास मराठी लुक करुन फोटो शेयर करत सकारात्मक संदेश दिला आहे.

अमृता लिहीते की, "महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा कामगार लढा, ही आंदोलनं एकजुटीमुळे यशस्वी होऊ शकली. आपल्या देशावर ओढावलेलं संकट हे एका विषाणूविरोधातील आंदोलनच आहे. त्यामुळे या आंदोलनातही आपण एकजूट दाखवली तर आपलीही या विषाणूविरोधातील चळवळ यशस्वी होईल. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive