नाटकांच्या प्रयोगाची तालीम, मालिका किंवा चित्रपटाचं चित्रीकरण या दरम्यान अनेक किस्से घडतात. हेच किस्से कलाकारांसाठी त्यांच्या प्रोजेक्टच्या आठवणी असतात. अभिने उमेश कामतने अशीच एक आठवण शेयर केली आहे. 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या नाटकात अभिनेता उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकाच्या तालमीतील किस्सा उमेशने शेयर केला आहे. या नाटकाच्या तालमी दरम्यान असं काही झालं होतं ज्यामुळे दिग्दर्शकाला तालीमच थांबवावी लागली होती.
दर रविवारी नाटकाच्या प्रयोगाची आणि तालमींची आठवण येत असल्याचं उमेश सांगतो. हे सांगाताना त्याने 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या तालमीची आठवण त्याने शेयर केली आहे. यासोबतच या तालमीचा व्हिडीओ जोडला आहे. या व्हिडीओत उमेश आणि सहकलाकार ऋषी मनोहर दोघं हसताना दिसत आहेत.
उमेश लिहीतो की, "रविवार म्हटला की नाटकाच्या प्रयोगची आठवण आल्याशिवाय राहत नाही, अनुषंगाने नाटकाच्या team ची , प्रयोगाच्या वेळी आणि तालमीत घडलेल्या किश्यांची पण आठवण येते. तालमीत एकदा ऋषी मनोहर आणि मला एक ठराविक वाक्य आलं कि हसू यायचं, त्या वाक्याला एकमेकांकडे बघितलं की हसू यायचं... शेवटी अद्वैत दादरकर हरला आणि त्याने तालिमच थांबवली." उमेशने ही मजेशीर आठवण शेयर केली आहे.