By  
on  

पाहा Video : 'तुझ्यात जीव रंगला'च्या आठवणीत रमल्या पाठक बाई, अक्षयाने शेयर केला व्हिडीओ

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. रांगडा गडी राणादा आणि शिक्षिका अंजली म्हणजेच पाठक बाई यांची अनोखी प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळाली होती. राणदा त्यांच्या भोळ्या, प्रेमळ स्वभावाने कसं अंजलीचं मन जिंकतो हे देखील पाहायला मिळालं होतं. या सगळ्यात राणादा आणि पाठक बाईंची जोडी प्रचंड चर्चेत आली होती. या मालिकेचा टीआरपी देखील अव्वल असे. 

मात्र या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिका आता सुरु नसली तरी मालिकेतील कलाकार या मालिकेच्या गोड आठवणीत रमताना दिसतात. अभिनेत्री अक्षया देवधरने या मालिकेत पाठक बाईंची भूमिका साकारली होती. याच भूमिकेच्या आठवणीत अनेकदा अक्षया सोशल मिडीयावर पोस्ट शेयर करते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

अक्षयाने या मालिकेतील पाठक बाईंचा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत पाठक बाई आनंदी दिसत आहेत. या मालिकेच्या सुरुवातीच्या भागातला हा व्हिडीओ आहे. अनेक दिवसांनी पाठक बाईंची झलक पाहुन चाहतेही सुखावलेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive