पाहा Photos : लॉकडाऊनमध्ये ही अभिनेत्री झाली इतकी फिट, फिटनेसकडे देत आहे लक्ष

By  
on  

सध्याच्या कोरोनाग्रस्त काळात अनेक जण घरातच आहेत. मात्र या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची ही चांगली वेळ आहे. काहीजण या वेळेत आपले छंद जोपासत आहेत तर काही जण काहीजण विविध गोष्टी शिकत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकार स्वत:वर मेहनत घेत आहेत.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने या लॉकडाऊनच्या काळात सध्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे. म्हणूनत प्रार्थना सध्या घरातच वर्कआउट करतेय. मात्र या मेहनतीचं फळ तिला मिळालय. कारण आता प्रार्थना चांगलीच फिट झाली आहे. याचं श्रेय ती तिच्या ट्रेनरला देते.

प्रार्थनाने तिचे काही फिट लुक फोटो शेयर केले आहेत. ती लिहीते की, "हेय तू यश पटेल. फक्त मी चांगल्या शेपमध्ये नाही तर मला आता खूप फ्रेश, आत्मविश्वास आलाय आणि आनंदी वाटतय. खूप धन्यवाद तुला एक पर्सनल ट्रेनर म्हणून तुझं टॅलेंट अप्रतिम आहे. माझ्यासाठी तू फिटनेसचा अर्थ बदललास."

या फिटनेससाठी प्रार्थनाने या पोस्टमधून तिच्या ट्रेनरचे आभार मानले आहेत. याशिवाय प्रार्थना आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी याच ट्रेनरकडून दररोज फिटनेस ट्रेनिंग घेतात. व्हिडीओ कॉल द्वारे दोघी आपआपल्या घरी त्यांच्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली वर्कआऊट करतात. 

 

Recommended

Loading...
Share