By  
on  

पाहा Video : दिपाली सय्यदचा मुलासोबतचा हा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री दिपाली सय्यद सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. दिपालीचे विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. मात्र नुकताच दिपालीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून व्हायरल होत आहे. दिपालीचा हा व्हिडीओ आहे तिच्या मुलासोबतचा.

या व्हिडीओत दिपाली तिचा मुलगा अली सय्यदसोबत डान्स करताना दिसतेय. अलीसोबत डान्स करताना दिपाली प्रचंड आनंदी दिसत आहे. या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एवढच काय तर चाहत्यांनी दिपालीला संतून मॉम म्हटलय. 

 

अनेक डान्स रिएलिटी शोसाठी दिपाली परिक्षक म्हणून दिसली आहे. एका डान्स रिएलिटी शोच्या मंचावर तर मुलगा अलीने हजेरी लावून तिला खास सरप्राईज दिलं होतं. दिपालीने आत्तापर्यंत विविध मालिका, चित्रपट, नाटक, रिएलिटी शोच्या माध्यमातून काम केलय. 'ये गो ये मैना' या गाण्यातून दिपाली चांगलीच लोकप्रिय झाली होती. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive