मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सोशल मिडीयावर आहेत. यापैकी काही कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील काही कलाकार ट्विटरवर देखील सक्रिय आहेत. यापैकी काही कलाकारांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड झाले असून त्यांना ट्विटरवर ब्लू टिक मिळालय.
नुकतच अभिनेता प्रसाद ओकचं अकाउंट देखील ट्विटरवर व्हेरिफाईड करण्यात आलय. प्रसाद ओकच्या ट्विटर अकाउंटला ब्लू टिक मिळालं असून प्रसादने यासाठी ट्विटरचे आभार मानले आहेत.
Finallyyyy ️ verified...!!!
Thanks @TwitterIndia @verified pic.twitter.com/IVpV9oB50h— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) May 4, 2021
तर अभिनेत्री तेजस्विनी पंडितचही ट्विटर अकाउंट आता व्हेरिफाईड करण्यात आलं असून तेजस्विनीला तिच्या अकाउंटवर ब्लू टिक मिळालयं. या दोन्ही कलाकारांचा ट्विटरवर मोठा चाहतावर्ग आहे.
Thank You @verified @TwitterIndia pic.twitter.com/vyFTHZw4n0
— TEJASWWINI (@tejaswwini) May 4, 2021
ट्विटरवर व्हेरिफाईड झालेल्या अकाउंटला ब्लू टिक हे चिन्ह दिलं जातं. सध्या ट्विटरसह विविध सोशल मिडीयाचा वापर करत कोरोना काळात अनेक कलाकार या सोशल मिडीयाचा वापर मदतीसाठी करत आहेत. कोरोना काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असून गरजूंची माहिती ट्विटर आणि इतर सोशल मिडीयावरुन मिळतेय. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी #MahaCovid हे हॅशटॅग वापरल्यामुळे कोरोनाग्रस्तांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदत मिळत आहेत.