By  
on  

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन

सध्या देशभरात कोरोनाचा थैमान पाहायला मिळतोय. राज्यातही कोरोना विषाणूमुळे अनेकांना जीन गमवावा लागतोय. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात हिंदीसह काही मराठी कलाकारही कोरोना संक्रमीत झाले आहेत. यातच एका अभिनेत्रीचा कोरोनाने जीव घेतलाय

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन झाल्याचं कळतय. त्यांचं डोंबिवलीत वास्तव्य होतं. 'बायको देता का बायको', 'प्रवास', 'छिछोर', 'मलाल' यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. 'बापमाणूस' या मालिकेतही अभिलाषा यांनी काम केलय.

 

अभिलाषा यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री पल्लवी पाटीलही अभिलाषाच्या निधनानं दु:खी झाली आहे. पल्लवीने पोस्टमध्ये अभिलाषाविषयी लिहीलं आहे. ती लिहीते की, " खूप मेहनत घेऊन काम करीत होतीस, बापमाणूसला आपण भेटलो होतो. आई होतीस माझी. . " नुसतं enjoy" असं म्हणून काम करायचीस. भूत काळात तुला संबोधताना त्रास होतोय.  जिथे असशील तिथे ही खूप कामं करत राहा... तुला प्रेम."

तर अभिनेता अतुल तोडणकर यांनीदेखील अभिलाषाच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलंय. 

सोशल मिडीयावर अनेकांनी अभिलाषाला श्रद्धांजली वाहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive