By  
on  

मराठा आरक्षणाच्या निकालावर दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, "निकाल धक्कादायक"

ज्या निकालावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं अशा मराठा आरक्षणावर सुप्रीय कोर्टाने निर्णय दिला आहे. सुप्रीय कोर्टाने मराठा आरक्षण रद्दचा निकाल दिला आहे. मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने बनवलेला कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. या निकालामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसलाय. या निर्णयावर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. मनोरंजन विश्वातील काही कलाकारही या निर्णयावर आपलं मत मांडत आहेत.

 

प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे हे देखील विविध विषयांवर सोशल मिडीयावर त्यांचं मत मांडताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर त्यांनीही सोशल मिडीयावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. केदार शिंदे लिहीतात की, "आजचा मराठा आरक्षण बद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल धक्कादायक. आरक्षण नाही, भाषेला अभिजात दर्जा नाही, मायभूमीत म्हणावा तसा टक्का नाही."

हा निकाल धक्कादायक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive