By  
on  

यादिवशी प्रसारित होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' ही मालिका

संपुर्ण भारतवर्षाला संविधानाच्या वाटेवर चालण्याची दिशा देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा मालिकेच्या स्वरुपात रसिकांसमोर येणार आहे. स्टार प्रवाहवर बुद्धपौर्णिमेचा मुहुर्त साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' रात्री नऊ वाजता सुरु होत आहे.

https://twitter.com/StarPravah/status/1120892619897196545

अलीकडेच याचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमधून त्यावेळी दलितांच्या दयनीय परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. पण बाबासाहेबांसारख्या प्रज्ञासुर्यामुळे हा त्रास नाहीसा झाला. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उपेक्षितांच्या जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचे हे महान कार्य मालिकेतून उलगडण्याचं शिवधनुष्य स्टार प्रवाह वाहिनी करणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive