विनोदवीर समीर चौगुले यांनी शेयर केला हा थ्रोबॅक फोटो

By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्राचं घरबसल्या मनोरंजन करतोय. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवतात. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम तणावमुक्त करतोय. 

या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार विनोदवीरने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातीलच एक आहेत अभिनेता समीर चौगुले. समीर यांच्या अनोख्या विनोदाच्या शैलीने, कॉमीक टायमिंगने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सोशल मिडीयावरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय समीर हे सोशल मिडीयावरही अधूनमधून सक्रिय असतात.

 

नुकताच समीर यांनी त्यांचा थ्रोबॅक फोटो शेयर केला आहे. "मागे वळून पाहताना ..गवसले खास काही.." असं कॅप्शन लिहून त्यांनी हा फोटो शेयर केला आहे. 

Recommended

Loading...
Share