By  
on  

पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत सौंदर्या घेणार दीपाचा शोध ?

'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. कार्तिकने दीपाच्या चारित्र्यावर संशय घेतला ज्यामुळे दीपा घर सोडून निघून गेलीय. तर आदित्य आणि श्वेता सौंदर्याला शहरापासून लांब घेऊन आलेत. अशात सौंदर्याला दीपाची काळजी वाटतेय. घर सोडून दीपा कुठे गेली असेल याच काळजीत सौंदर्या आहे.

दीपाला तिच्या वडिलांनीही नाकारलं. प्रेग्नेंट असलेल्या दीपाला एका जोडप्याने मदतीचा हात देऊन आता भाड्याने राहायला घर दिलय. त्यातच दीपा आता स्वत:च्या पायावर उभी राहतेय. मात्र तिला अजूनही सगळ्यांची आठवण येतेय. सौंदर्या ही अजूनही तिचा परिवाराचा भाग असल्याची जाणीव तिला आहे. कार्तिकने तिचा आणि बाळांचा अस्विकार केला मात्र सौंदर्याने तिला आपलसं केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

दीपाने नुकतच सासूबाई सौंदर्यासाठी डबा पाठवलाय. ते खाताच सौंदर्याला दीपाच्या हातचं जेवण खाल्ल्याचा भास होतो. या प्रसंगानंतर सौंदर्या स्वत:दीपाचा शोध घेईल का ? कार्तिकसमोर खरं सत्य समोर येईल का ? तो दीपाची माफी मागुन तिला पुन्हा घरात आणेल का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता पुढील भागांमध्ये पाहायला मिळतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive