पाहा Photos : अभिनेत्री सई ताम्हणकरच्या सुंदर अदा, शेयर केले या लुकमधील फोटो

By  
on  

अभिनेत्री सई ताम्हणकर ही सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सई तिच्या चाहत्यांशी संवाद साधते. शिवाय तिचे लेटेस्ट अपडेट्स, फोटो आणि व्हिडीओही पाहायला मिळतात.

सईने नुकतेच काही लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये सईचा खास लुक पाहायला मिळतोय. सिल्व्हर दागिने आणि पांढरी कुर्ती असा हा लुक आहे.

चाहत्यांनी सईच्या या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "कारण नसताना फोटो काढून स्वत:ला प्रेरीत करतेय."

आगामी काळात सई ही 'मीमी' या हिंदी चित्रपटात अभिनेत्री क्रिती सनॉनसोबत झळकणार आहे. याशिवाय 'मिडीयम स्पायसी', 'इंडिया लॉकडाऊन', 'कलरफुल' या चित्रपटांमध्येही सई झळकेल.

Recommended

Loading...
Share