By  
on  

जागतिक परिचारिका दिन : या मराठी चित्रपट, मालिकांमधून या कलाकारांनी साकारली परिचारिका

दरवर्षी 12 मे रोजी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. 1854 साली क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करून मदत करणारी परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. त्यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राची संस्थापिकाही मानले जाते. त्यांचा वाढदिवस हा जागतिनक परिचारिका दिन म्हणून साजरा करत जगभरातील परिचारिकांसाठीच्या कार्याचा हा गौरवदिवस आहे. सध्याच्या कोरोना काळात या परिचारिकांचं काम मोलाचं आहे.

मनोरंजन क्षेत्रातही कायम परिचारिकांचा आदर केला जातो. यासाठी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमध्येही परिचारिकांच्या भूमिका पाहायला मिळाल्या आहेत. अनेक कलाकारांनी रुग्णांची सेवा करणाऱ्या या परिचारिका पडद्यावर, टेलिव्हिजन, रंगमंचावर साकारल्या आहेत.

1979 साली 'अपराध' या मराठी चित्रपटात अभिनेते रमेश देव आणि सीमा देव ही जोडी झळकली होती. खऱ्या आयुष्यातील हे जोडपं जेव्हा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकले तेव्हा त्या कलाकृतीची शोभा आणखी वाढली. अभिनेत्री सीमा देव यांनी या चित्रपटात परिचारिकेची भूमिका साकारली होती. या गाजलेल्या चित्रपटातील श्रवणीय गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

मराठीतील विविध चित्रपटांमध्ये डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या भूमिका दाखवण्यात आल्यात. यात 'डॉक्टर डॉक्टर' या सुपरहीट मराठी चित्रपटाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. या चित्रपटात अभिनेते लक्ष्मी, कुलदीप पवार आणि अभिनेत्री अलका कुबला हे कलाकार झळकले होते. अलका कुबल यांनी या चित्रपटात परिचारिकेची भूमिका साकारली होती. 

मालिकाविश्वात डॉक्टर्स आणि वैद्यकिय क्षेत्रावर अनेक मालिका पाहायला मिळतात. यात अनेकता परिचारिकांच्या भूमिका पाहायला मिळतात. अनेक मराठी अभिनेत्रींनी या भूमिका उत्तररित्या साकारल्या आहेत. सध्याची काही उदाहरणं घेतली तर अभिनेत्री रेश्मा शिंदे, जुई गडकरी, मिताली मयेकर या इतर बऱ्याच अभिनेत्रींनी टेलिव्हीजनवर परिचारिकांचं कार्य भूमिकांमधून साकारलय.

'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे परिचारिकेच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेती दीपाची आई परिचारिका असते त्यामुळे त्याविषयीची आवड तिलाही दाखवण्यात आली आहे. मात्र ही भूमिका तिने काही भागांपुरती पार पाडली होती. 

'वर्तुळ' या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी झळकली होती. या मालिकेत तिने पल्लवी नावाचं पात्र साकारलं होतं. जुईनेही परिचारिकेची भूमिका या मालिकेत पार पाडली आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने तिने सोशल मिडीयावर याविषयी पोस्ट करून त्यांच्याविषयी असलेला आदर व्यक्त केलाय.

' लाडाची मी लेक गं' या मालिकेत अभिनेत्री मिताली मयेकर परिचारिकेच्या भूमिकेत दिसली.

मात्र त्यानंतर मालिकेला वेगळं वळण मिळत गेलं. मात्र तिनेही ही भूमिका उत्तम साकारली. 

यासह अनेक डॉक्टर्सवर आधारित मालिकांमध्ये परिचारिकांच्या भूमिका पाहायला मिळतात. मराठी, हिंदीसह इंग्रजीतही परिचारिकांच्या कार्यावर आधारित चित्रपट आणि मालिका बनवल्या आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive