By  
on  

चिंची चेटकीणीच्या अदाकारीला प्रेक्षकांची पसंती, अलबत्या गलबत्याचे ३०० प्रयोग पुर्ण

मराठी नाटक ‘अलबत्या गलबत्या’ने अलीकडेच ३०० प्रयोगांचा जादुई आकडा पार केला आहे. साता-याला हा तीनशेवा प्रयोग पार पाडला. या नाटकाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलं आहे. यातील प्रसिद्ध चिंची चेटकिणीची भूमिका वैभव मांगले साकारत आहे. याशिवाय कृष्णा वानखेडे, कुणाल धुमाळ, दिलीप कराड, सागर सातपुते, सनी मुणगेकर, संदीप रेडकर, दीपक कदम, सायली बंडकर, श्रद्धा हांडे यांच्याही भूमिका आहेत. या नाटकाच्या संपुर्ण टीमच्या कष्टाचं हे फळ असल्याची भावनाही यावेळी कलाकारांनी व्यक्त केली आहे. रत्नाकर मतकरी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. या नाटकाची प्रस्तुती झी मराठीने केली आहे.

https://www.instagram.com/p/Bwz3yiZjRcp/?utm_source=ig_web_copy_link

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive