By  
on  

कोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठी'चा सलाम, कोरोना योद्धांना करणार सन्मानित

 राज्यासह देशभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलय. कोरोना विरुद्ध या लढाईत पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, विविध कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून वॉरियर बनून देशाच्या सेवेत आहेत. अशा कोरोना वॉरियर्सना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी प्लॅनेट मराठी नवा उपक्रम राबवणार आहेत. सध्याच्या कोरोना विरुद्ध लढाईत मानसिकरित्या खचित झालेले, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांचे मनोधैर्य वाढवून त्यांना भावनिक आधार देण्याचे काम योद्धा योद्धा करत आहेत. या अशाच योद्धांना सन्मानित करण्यासाठीचा हा उपक्रम असेल.

प्लॅनेट मराठीच्या चौध्या वर्धापन दिनी ही घोषणा करण्यात आली आहे. सध्याच्या डिजीटल, ओटीटी युगात प्लॅनेट मराठी हा पहिला वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2017 साली अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. कमी कालावधीतच याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. आता हा पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म कधी भेटीला येणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 

 या लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक योद्ध्याला 'प्लॅनेट मराठीचा सलाम'. या कठीण काळात सेलिब्रिटीजपासून सामान्य नागरिकांनी केलेल्या अविरत कार्याची  'प्लॅनेट मराठीचा सलाम'मध्य दखल घेतली जाणार आहे. याची मूळ संकल्पना 'प्लॅनेट मराठी' सोशल मीडियाच्या एव्हीपी जयंती बामणे- वाघधरे यांची असून त्यांचा या उपक्रमात प्रमुख सहभाग असेल.


 

आपल्या चार वर्षांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ''प्लॅनेट मराठीचा हा चार वर्षांचा प्रवास निश्चितच आनंददायी आणि अपेक्षित असाच आहे. आज चौथ्या वर्धापन दिनाचा आनंद नक्कीच आहे. मात्र सध्याची स्थिती ही आनंद व्यक्त करण्यासारखी नाही. त्यामुळेच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत 'प्लॅनेट मराठी'ने या काळात लढणाऱ्या योद्धांना 'प्लॅनेट मराठीचा सलाम' हा उपक्रम सुरु केला आहे. यात सेलिब्रिटीजसोबत सामान्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यांनी या लढाईत विविध मार्गांनी मदतीचा हातभार लावला आहे आणि प्लॅनेट मराठीच्या यशाबद्दल बोलायचे तर ही फक्त सुरुवात आहे अजून यशाचा बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रेक्षकांना दिलेले वचन पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी 'प्लॅनेट मराठी' नेहमीच प्रयत्नशील असेल.''

Author

Recommended

PeepingMoon Exclusive