पाहा Photos : अप्सरा आली ! सोनाली कुलकर्णीच्या या लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सोशल मिडीयावरील पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. सोनाली सोशल मिडीयावर काय पोस्ट करते याकडे तिच्या चाहत्यांचं, फॉलोअर्सचं लक्ष असतं. सोनालीने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलय. या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय.

'सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस' या विनोदी कार्यक्रमाच्या सेटवर कोरोना काळापूर्वी 'झीम्मा' या आगामी चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी या चित्रपटातील अभिनेत्री सोनालीही यावेळी हजर होती. या कार्यक्रमात प्रमोशनसाठी आलेल्या सोनालीने सुंदर आकाशी - निळ्या रंगाचा लांब गाऊन परिधान केला होता. हे थ्रोबॅक फोटो सोनालीने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीचा सुंदर लुक पाहायला मिळतोय. 'सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस' कार्यक्रमातील पाहुण्यांच्या उपस्थितीतला हा भाग 13 मे रोजी गुरुवारी रात्री प्रसारीत करण्यात येणार आहे.

Recommended

Loading...
Share