By  
on  

जून महिन्यात 'प्लॅनेट मराठी'वर प्रदर्शित होणार 'जून' हा सिनेमा

'जून' या चित्रपटाची चर्चा असतानाच या सिनेमाविषयी नवी घोषणा करण्यात आली आहे. जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्लॅनेट मराठी या पहिल्या वहिल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होईल. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. निखिल महाजन यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून जितेंद्र जोशी यांचे गीत आहेत. तर गायिका शाल्मली खोलगडे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच संगीतकाराची भूमिका बजावत आहे. 

51 व्या 'इफ्फी' (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया) मधील इंडियन पॅनोरोमा या विभागात जून या सिनेमाची निवड झाली आहे. याशिवाय पुणे चित्रपट महोत्सव, केरळ चित्रपट महोत्सव आणि आता न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवातही जूनची निवड झाली आहे. यात सर्वोत्तम अभिनयाच्या पुरस्काराच्या नामांकनामध्ये नेहा पेंडसे बायस आणि सिद्धार्थ मेननची निवड झाली आहे. सुप्री मीडियाचे शार्दुल सिंग बायस, नेहा पेंडसे-बायस आणि ब्लू-ड्रॉप प्रा. लि. चे निखिल महाजन आणि पवन मालू यांच्या संयुक्त विद्यमाने 'जून'ची निर्मिती करण्यात आली आहे. 'जून'च्या निमित्ताने निखिल महाजन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive