By  
on  

Spotted: बिग बॉस मराठीची स्पर्धक अभिनेत्री स्मिता गोंदकरची बिनधास्त झलक

बिग बॉस मराठीच्या विजेत्याचं नाव मागच्याच आठवड्यात जाहीर झालं. मेघा धाडेने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. पण बिग बॉस मराठीच्या ग्रॅंड फिनालेत टॉप तीन स्पर्धकांमध्ये पोहचण्याचा मान ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकरने पटकावला. तिची एक सुंदर आणि बिनधास्त झलक नुकतीच वांद्रे येथे पाहायला मिळाली.

बिग बॉसच्या घरात स्मिताने स्वत:चं एक वेगळेपण सिध्द केलं होतं. तिच्या फॅशन आणि लूकची भूरळ बिग बॉसमध्ये सर्वांनाच पडली. तिने कधीच घरातील इतर स्पर्धकांबरोबर वाद घातला नाही किंवा कोणाला कधी दूषणं लावली नाहीत. तिच्या चांगुलपणाची चर्चा नेहमीच बिग बॉसच्या घरात आणि बाहेर प्रेक्षकांमध्येसुध्दा झाली.

काळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेल्या स्मिता गोंदकरवर उपस्थित सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

पप्पी दे पारुला, म्हणत स्मिता आपल्या मनोहक अदांनी भुरळ पाडत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive