सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये विविध नियम घालून दिले आहेत. यात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही राज्यात बंदी आहे. म्हणूनच अनेक मालिकांचे चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर होत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकाचेही चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु आहे.सध्या उमरगाव येथे या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे.
चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु असल्याने कलाकार आपल्या परिवारापासून दुरावले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सेट हेच घर आणि सहकलाकार हे कुटुंब झालय. अभिनेत्री सुखदा खांडकेकरच्या बाबतीतही हेच झालय. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सुखदा कुटुंबापासून दूर आहे. असं असलं तरी या मालिकेची संपूर्ण टीम कुटुंबासमान असल्याने सुखदा सेटवर रमतेय.
सुखदाने नुकतेच सोशल मिडीयावर मालिकेच्या सेटवरील फोटो शेयर केले आहेत. शिवाय ऑफस्क्रिन या कलाकारांची कशी मैत्री आहे हे या फोटोंमधून पाहायला मिळतय.
या मालिकेत सुखदा द्वारकाबाईच्या भूमिकेत आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकथा या मालिकेतून पाहायला मिळतेय. या मालिकेत बहुंताश मराठी कलाकारांचा समावेश असल्याने त्यांची बॉंडींगही छान झाल्याचं दिसतय. यात अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे आणि सुखदा यांचे एकत्र फोटोही पाहायला मिळत आहेत. सेटवर दोघांची चांगलीच मैत्री झालीय एवढं नक्की.