पाहा Photos : शर्वरीच्या प्रेमासाठी शंतनूने चुलीवर बनवला हा पदार्थ

By  
on  

'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच शर्वरीवर असलेल्या प्रेमासाठी शंतून नवी परिक्षा देतोय. शंतनू चक्क चुलीवर जेवण बनवतोय. शर्वरीवरच्या प्रेमासाठी चुलीवर स्वयंपाक करण्याच्या परीक्षेत शंतनू पास होणार का हे आता या मालिकेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

यातच शंतनूची भूमिका साकारणारा अभिनेता सुयश टिळक मात्र चुलीवर जेवण बनवण्याची मजा लुटत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. सुयशने सोशल मिडीयावर काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये सुयश चुलीवर नूडल्स बनवताना दिसतोय. चुलीवर नूडल्स बनवतानाचे सुयशचे हे फोटो पसंत केले जात आहेत. मनोरंजन विश्वातील त्याच्या अनेक मित्र-मैत्रीणींनी या फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत. शिवाय या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.

'शुभमंगल ऑनलाईन' निमित्ताने सुयशने चुलीवर जेवण बनवण्याचा आनंद कसा लुटला हे यात  पाहायला मिळतय. आता सेटवर या नूडल्सवर सगळ्यांनी ताव मारला असणार एवढं नक्की.

Recommended

Loading...
Share