By  
on  

'शांताबाई' गाण्यावर थिरकला हा अभिनेता, म्हणतो "जेव्हा शांताबाई हे गाणं सुरू होतं..."

मराठीतील अशी काही गाणी आहेत जी थिरकायला भाग पाडतात. लग्नसोहळे, पार्टीत आणि इतर कार्यक्रमांमध्ये अशा गाण्यांनी धमाल उडते. असच एक गाणं म्हणजे 'शांताबाई'. 'शांताबाई' या गाण्याची प्रचंड क्रेज आहे. हळदी समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये हे गाणं सर्रास वाजवलं जातं आणि या गाण्यावर ठेका धरला जातो.

'शांताबाई' या गाण्यावर अभिनेता हेमंत ढोमेही थिरकतो. अशीच एक आठवण त्याने शेयर केली आहे. हेमंत ढोमेने या गाण्यावर डान्स करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. शिवाय नेटकऱ्यांना त्यांचं नाचो गाणं कोणतय हे देखील विचारलय. हेमंतने या फोटोत जॅकेट डोक्यावर पदरासारखं गुंडाळलेलं दिसतय.

हेमंत या पोस्टमध्ये लिहीतो की, "जेव्हा शांताबाई... शांताबाई... हे गाणं सुरू होतं... आणि तुम्ही मित्राचं जॅकेट ओढुन डोक्यावर पदर घेता, मग तुम्ही पदरचा परफार्मन्स करता जो लोक डोक्यावर घेतात! सांगा तुमचं नाचो गाणं!"

 

हेमंतच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स आता पाहायला मिळत आहेत. त्यांनीही त्यांची अतरंगी नाचो गाणी शेयर केली आहे. हेमंतची ही गमतीशीर पोस्ट सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive