By  
on  

स्वप्निल जोशीने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या सविस्तर

करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकूळ घातलाय. अद्यापही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र झटतायत.  या लाटेमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवडा, बेड्स, औषधं अशा अनेक समस्यांचासुध्दा  सामना करावा लागत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊनसारखे कडक निर्बंधसुध्दा लावले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणा-या मजुरांचे बरेच हाल झाले. त्यातच लॉकडाऊनमुळे सिनेमा मालिकांचं चित्रिकरणसुध्दा महाराष्ट्रात करण्यास बंदी आणली. त्यामुळे पडद्यामागचे कामगार बेरोजगार झाले. 

या कठीण काळात बरेच लोक आणि सेलिब्रिटी एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. सुपरस्टार अभिनेता स्वप्निल जोशीनेसुध्दा या कठिण काळात पडद्यामगाच्या कामगारांना-गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. अभिनेता स्वप्नील जोशीनेसुद्धा सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांच्या बरोबर  मीडिया बझच्या सहायाने फिल्म इंडस्ट्रीमधील स्पॉट्स बॉयचे काम करणाऱ्या लोकांना १०० हून अधिक रेशन किटचे वितरण केले. स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना देखील  गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive