By  
on  

पाहा Video : जगभरात 'फ्रेंड्स' रियुनियनची चर्चा, क्रांति रेडकरचं कुटुंब मात्र या प्रतिक्षेत

'फ्रेंड्स' या कार्यक्रमाचा जगभरात चाहतावर्ग आहे. आता लवकरच झी - 5 याच 'फ्रेंड्स' कलाकारांचं रियुनियन पाहायला मिळणार आहे. याकडे जगभराती फ्रेंड्स चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे 'फ्रेंड्स'ची चर्चा होत असताना अभिनेत्री क्रांति रेडकरचा परिवार मात्र वेगळ्याच रियुनियनच्या प्रतिक्षेत आहेत.

क्रांतिने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत क्रांतिचं कुटुंब टिव्ही पाहताना दिसत आहेत. टेलिव्हिजनवर 'आई कुठे काय करते' ही मालिका ते पाहत दिसतायत. हा व्हिडीओ पोस्ट करून क्रांति लिहीते की ही मालिका सुरु झाली की तिचे आई-वडील ही मालिका पाहण्यात गुंग होतात. 

व्हिडीओमध्ये क्रांति लिहीते की, "जिथे जग फ्रेंड्सच्या रियुनियनची वाट पाहतय तिथे माझं कुटुंब मात्र आई आणि तिच्या पतिच्या रियुनियनची वाट पाहत आहेत."

 

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही मालिका कौटुंबिक असल्याने अनेक कुटुंब ही मालिका पाहण्यात दंग असतात. यातच क्रांतिचा परिवार आणि विशेषकरुन आई-वडिल ही मालिका मिस करत नाहीत. आणि सध्या या मालिकेत अरुंधती म्हणजे आई आणि तिचा पति म्हणजे अनिरुद्ध यांच्या रियुनियनची वाट पाहिली जात असल्याचं क्रांति या पोस्टमध्ये सांगतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive