धकधक गर्ल माधुरी दीक्षित मराठी सिनेसृष्ट्रीत कधी येणार याविषयी तिच्या अनेक मराठी चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर माधुरीला उत्तम आणि योग्य स्क्रिप्ट सापडली आणि 2018 मध्ये बकेटलिस्ट या चित्रपटातून माधुरीने मराठीत पदार्पण केलं. तेजस देऊस्करने यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाला नुकतीच 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने तेजस यांनी या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता. ज्यात माधुरीसह अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलय.
सुमीत राघवन, सुमेध मुदगलकर, वंदना गुप्ते, कृतिका देव, रेशम टीपणीस, प्रदीप वेलणकर, शाल्व किंजवडेकर, शुभा खोटे, रितिका श्रोत्री, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका शहाणे हे कलाकार या चित्रपटात झळकले होते. अभिनेता रणबीर कपूरने यात पाहुणा कलाकार म्हणून सहभाग घेतलाय.
दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचे काही खास क्षण शेयर केले आहेत. ते लिहीतात की, "बकेटलिस्टची 3 वर्षे. हा एक प्रवास होता. या चित्रपटाने मला आणि या चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येकाला एक वेगळी ओळख दिली आहे. आणि काही आठवणी ज्या कायम स्मरणात राहतील. जेव्हा एक प्रवास असतो तेव्हा एक माईल्डस्टोन असतं. काही लोकं तुमच्यात सहभागी होतात तर काही वेगळा मार्ग निवडतात. हा एक खेळाचा भाग आहे. मला त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत जे यात माझ्यासोबत उभे राहिले. मी तुमचा पाठिंबा आणि प्रेम कधीच विसरणार नाही."
या पोस्टमध्ये माधुरीसोबतच्या काही खास आठवणी फोटोरुपात तेजस यांनी शेयर केल्या आहेत.