By  
on  

सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांचं 'मिडीयम स्पायसी'

आजकाल अनेक नानाविविध प्रयोग मराठी सिनेसृष्टीत होताना पाहायला मिळतात. असाच  धमाकेदार मनोरंजनाचा नजराणा घेऊऩ आणखी एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'मिडीयम स्पायसी' असं चटपटीत नाव असलेल्या ह्या सिनेमानिमित्त सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे हे प्रसिध्द कलाकार प्रथमच एकत्र झळकणार आहेत.

रंगभूमी गाजवणारे दिग्दर्शक मोहित टाकळकर यांचं दिग्दर्शन लाभलेला 'मिडीयम स्पायसी' हा पहिला मराठी सिनेमा आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे प्रसिध्द निर्मात्या विधी कासलीवाल यांच्या लॅण्डमार्क फिल्मने या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

दिग्दर्शक मोहित टाकळकर आणि निर्मात्या विधी कासलीवाल यांच्या सिनेमात काम करण्यास हे त्रिकुट प्रचंड उत्सुक असल्याची कल्पना या फोटोवरुन येतेच आहे. या महिन्याच्या अखेरीस या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करण्यात येणार आहे.

प्रसिध्द सिनेतज्ञ तरण आदर्श यांनीसुध्दा ट्विटरवरुन 'मिडीयम स्पायसी' या मराठी सिनेमाची घोषणा करत दिग्दर्शक आणि कलाकारांचा उलगडा केला.

https://twitter.com/taran_adarsh/status/1126693852188823553

निर्मात्या विधी कासलीवाल यांनीसुध्दा ट्विट करत आपल्या आगामी सिनेमाची चाहत्यांना माहिती दिली. भाऊ कदम याची प्रमुख भूमिका असलेला 'नशिबवान'नंतरचा हा मराठी प्रोजेक्ट आहे.

https://twitter.com/VidhiKasliwal/status/1126722496512741376

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive